सांगोला प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व भाग्यश्री ब्रास बँड पुणे चे मालक श्री दाजी सोनाप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या गावांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये यावर्षी कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थी ,शिक्षक, समाजसेवक यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा. प्रा. परमेश्वर उत्तमराव झांबरे सर, श्रीमती वंदना नानासाहेब भोसले मॅडम, मा. श्री धनंजय गणपत नरळे, मा. श्री संजय दत्तात्रय भोसले, मा. गोकुळा बबन बाड मॅडम यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या कु. प्रतीक्षा दत्तात्रेय जाधव, चि. कार्तिक समाधान बागल, चि. अर्णव गोवर्धन जाधव, चि. जय नवल गाडे, याबरोबर नूतन पोलीस श्री.अतुल दत्तात्रय खांडेकर ,भ्रष्टाचार जन आंदोलन समिती तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल श्री. अमर कालिदास कोळी यांचा व लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळालेबद्दल सौ. कल्याणी राजकुमार भादुले यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या सर्वांना दाजी सोनाप्पा शिंदे यांचे वतीने शाल, श्रीफळ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.पियुषदादा साळुंखे पाटील प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल व लोखंडे सर यांनी प्रबोधनात्मक मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदन बागल, विक्रम शिंदे, नितीन शिंदे, कासलिंग खिलारे, धनाजी शिंदे, समाधान खांडेकर,गोरख वाघमारे, दत्तात्रय जाधव, विकास इंगोले यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रम अध्यक्ष प्रा. श्री परमेश्वर झांबरे सर, मा. दिग्विजय शहाजी बापू पाटील, मा. सांगोल्याचे लोकप्रिय डॉ. पियुष दादा साळुंखे पाटील, प्रा. दत्तात्रय काळेल, मा. महादेव शिंदे वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील प्रगतशील बागायतदार विठ्ठल तात्या शिंदे, युवा नेते समाधान बागल, रामचंद्र शिंदे, महादेव इंगोले, बळी अण्णा साळुंखे, युवराज केदार, सुखदेव खांडेकर, कुमार नरळे,सोनाजी खिलारे,मानाजी खिलारे, सोमनाथ होळकर, अमोल कांबळे, प्रल्हाद नरळे,विक्रम बागल,ओंकार चव्हाण,भूषण बागल,आनंद देवकते बालाजी शिंदे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सेवा सोसायटीचे संचालक व रेडिओ स्टार श्री. दत्तात्रय शिंदे व ग्रामपंचायत सदस्य नवल कुमार गाडे यांनी केले.