पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।
व्रत एकादशी करीन उपवासी।
गाईन अहर्निशी मुखी नाम।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
बीज कण्यांतीचे तुका म्हणे।।
- संत तुकाराम
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
"पंढरपूर सायकल वारी" असाच एक अदभुत व भव्य दिव्य आनंददायी अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सायकल हे पर्यावरण पुरक वाहन आहे.लोकांनी जास्ती जास्त सायकल वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी व आपली वसुंधरा निसर्गरम्य व्हावी या साठीच "महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारीचा" हा अट्टाहास.
चला तर मग एक भव्य दिव्य रींगण सोहळा पाहण्यासाठी रेल्वे मॆदान,पंढरपूर
दि:- ११ जुन सकाळी ७:३०
ज्ञानोबा-तुकाराम नामघोषात सामील होऊ या..!
या सोहळ्या करीता हजारो सायकलस्वार महीला-पुरुष महाराष्ट्रातील अनेक गावातून वेग वेगळे सायकल गृप सायकलवर पंढरपुरात येणार आहेत तेही पांडुरंगा करीता.
समस्त पंढरपूर करांना नम्र आवाहन आजपासूनच आपणही जास्ती जास्त आपली कामे सायकलवर करूया व प्रदूषण टाळूया,पर्यावरण वाचवूया.आणि निरोगी,तंदूरूस्त राहूयात.
सायकल चालवा...!
निरोगी रहा....!
पर्यावरण वाचवा....!
पंढरपूर सायकलर्स क्लब,पंढरपूर