पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण
पंढरपूर प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे येथे दि ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध झाडांचे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी संबोधित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी अशोक यलमार, जे के सुपर सीमेंट चे अधिकारी पंकज साखरकर , विवेक हजारे, रेवणसिद्ध पाटील उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी पाहुण्यांचे सत्कार करून स्वागत केले. महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिरिंग विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्व विषद करून पर्यावरण बचावासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे असे सांगून वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले.
महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी 'बिजारोपण ते वृक्षारोपण' व 'एक पेड देश के नाम ' याविषयी ची संकल्पना सर्वांना सांगून प्रत्येकानी घरामद्धे एक तरी झाड लावावे, ते जगवावे व इतरांना हस्तांतरित करून वृक्ष लागवडीची ही चळवळ वाढवावी असे आवाहन केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदरच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अमरजीत देवकर व प्रा. सागर पवार यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.