पंढरपूर प्रतिनिधी
नेहमी यशस्वीतेच्या शिखरावर असलेल्या मा.सौ.सुनेत्रा ताई विजयसिंह पवार यांचे मार्गदर्शनाखालील पंढरीतील श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर जिल्हा सोलापूर या प्रशालेचा इयत्ता दहावी मार्च 2023 चा वार्षिक निकाल 98 टक्के लागला आहे .
या प्रशालेत प्रथम .आदित्य बबनराव घाडगे ९१% ,द्वितीय साईराज सुसेन गरड 90% ,तृतीय. मुनीर महंमद गौस तांबोळी 87 टक्के गुण मिळवून यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल यांचे व इ.१२वी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील यशस्वीतांचा संस्था सचिवा सुनेत्राताई पवार मार्गदर्शक विजयसिंह पवार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय पवार तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका नंदिनी गायकवाड यांनी या यशस्वितांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले .
यावेळी मार्गदर्शन करताना सौ.सुनेत्राताई पवार म्हणाले की जिवन जगत असताना विद्यार्थ्यांने आपल्या स्वभावात नम्रता व स्नेह जपण्याचे आवाहन करून परीक्षेचे यश हे सातत्याने केलेल्या सरावावर अवलंबून असते.त्यामुळे सर्वांनी सातत्याने सरावात लक्ष दिल्यास यश सहज मिळते.
तसेच इयत्ता दहावी 17 नंबर बहिस्थ केंद्राचा ही निकाल शंभर टक्के लागला असून यांचेही अभिनंदन करून सर्वांना पुढील शैक्षणिक काळासाठी शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.
या कार्यक्रमाला पालक वर्ग व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.