सोलापूर प्रतिनिधी
लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने विजापूर रोड येथील सोलापूरच्या प्रवेशद्वारा समजल्या जाणाऱ्या सोरेगाव या शहराच्या हद्दीजवळ हॉटेल ग्रीनवुड रिसॉर्ट च्या समोरील दुभाजकात अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांचा संकल्पनेतून वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे 100 झाडे लावून तेथे लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने वेलकम टु सोलापूर असा बोर्ड बसवून तेथील परिसर सुशोभीकरण करण्यात आले.
याचे उद्घाटन प्रांतपाल राजशेखरजी कापसे व प्रांतातील प्रथम महिला वैशाली कापसे यांच्या हस्ते व प्रांतीय सहसचिव अशोक भांजे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला यावेळी प्रस्ताविक मध्ये बोलताना अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी कर्नाटक तसेच इतर राज्यातून लोक सोलापूरला येत असताना सोलापूरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या सोलापूर शहर हद्दी मध्ये प्रवेश करताना लोकांना आनंद व आकर्षक वाटावा या उद्देशाने हा उपक्रम घेतल्याचे म्हणाले.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणा मध्ये माननीय प्रांतपाल यांनी लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी ने वर्षभरात विविध समाजोपयोगी अनेक उपक्रम घेतले असून असाच हा एक पर्यावरण पुरक उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले आणि ह्या उपक्रमा मुळे समाज्यामध्ये लायन्स क्लबची प्रतिमा नक्कीच वाढ होण्यास मदत होईल असे म्हणून त्यांनी अध्यक्ष अभियंता सागर पुकळे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सचिव अभियंता रविकिरण वायचळ माजी अध्यक्ष नंदिनी जाधव, मुकुंद जाधव ममता बुगडे, नागेश बुगडे, तसेच वरधा देसाई, नागेश चपळगी सागर कैयावाले, वैभव जाधव, यशोमती जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

