पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे शरद अजिनाथ पवार (रा.बेंबळे, ता.माढा) यांनी राज्यस्तरीय स्पर्धा 'फिएस्टा २ के२३' मध्ये ‘मिस्टर परफेक्ट’ या स्पर्धा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.
'इंग्लिश बुक रिडिंग, ड्रामा अँड लिटररी स्टुडंट क्लब' आणि 'अॅश्रे स्वेरी स्टुडंटस ब्रँच' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा 'फिएस्टा २ के २३' मध्ये ‘मिस्टर परफेक्ट’ या स्पर्धेत एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात रँप वॉक, टॅलेंट शो आणि प्रश्नोत्तरे अशा एकूण तीन फेऱ्या झाल्या. यातून अखेर शरद अजिनाथ पवार हे विजयी झाले. परीक्षक म्हणून प्रा.प्रज्ञा भुसे व एमबीए विभागातील वर्षकेत वाघ यांनी काम पाहिले. विजेत्या शरद पवार यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
स्पर्धेवेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा साकारली होती. त्यांचे चालणे रुबाबदार होते. चेहऱ्याची ठेवण आकर्षक होती तर प्रत्येक प्रश्नाची उत्तरे ते हजरजबाबीने देत होते. त्यामुळे परीक्षणानंतर ते विजेते ठरले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगात अनेक कलागुण असताना देखील केवळ स्टेज डेअरिंग नसल्यामुळे मागे राहतात. नेमका हाच धागा पकडून विद्यार्थ्यांच्या मुलभूत कलागुणांना वाव देण्यासाठी स्वेरी कडून अशा विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्वेरी मध्ये 'फिएस्टा २ के२३' हा इव्हेंट पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आणि ‘मिस्टर परफेक्ट’ ही स्पर्धा देखील पहिल्यांदाच आयोजित केली होती.
‘मिस्टर परफेक्ट’ म्हणून विजेता झाल्यामुळे शरद अजिनाथ पवार यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.