धनकवडी प्रतिनिधी
मेन रोडवरील चेंबर ब्लॉक झाल्याने रिटन पाणी नागरिकांच्या घरात शिरले.
२१/०५/२०२३ रोजी रात्री घडलेला प्रकार
सर्वे नं ३७/१, फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी येथील रहवासी प्रशांत अनपट यांच्या घरातील घडलेला प्रकार आम्हाला सांगितल्यावर आम्ही याबाबत संबंधित अधिकारी यांकडे तक्रार केली होती.
पण रविवार सुट्टी असताना नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देऊन धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी जे ई कविता पाटील , धनराज नवले व मुकादम बाबर आणि कर्मचारी वर्ग यांनी वेळ काळ न पाहता अर्ध्या रात्रीत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यतत्परता दाखवलाबद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.अशी माहिती पतित पावन संघटना खडकवासला विभाग अध्यक्ष विजय विठ्ठलराव क्षीरसागर यांनी दिली आहे.