पंढरपूर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्यावतीने मंगळवार दिनांक २ मे २०२३ रोजी पंढरपूर येथील रोटरी भवन कार्यालयात रोटरी क्लबला विविध क्षेत्रातुन सेवा देणाऱ्या मान्यवरांना सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती रोटरी क्लब अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
हा कार्यक्रमास डिस्टिक गव्हर्नर रो. रूकमेश जकोटीया यांच्या उपस्थित घेण्यात आला. आपण समाजाचे काही देणे लागतो, हे मनाशी ठरवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात समाजाची सेवा करावी, अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ‘रोटरी’ तर्फे विविध सेवा पुरस्कार देण्यात आले. विनोद शेंडगे, प्रशांत वाघमारे, पञकार प्रमोद बनसोडे, बापु माने, दत्तात्रय पवार, विनय लाड, शांतीनाथ बागल, सागर कारंडे, संजय देशमुख, जयप्रकाश जाधव आदींना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर च्या वतीने सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास रो. विश्वास आराध्ये, रो. जयंत हरिदास, रो. डॉ. दिलीप अचलारे, रो. विनोद भाटिया, रो. राजेंद्र केसकर, रो. आनंद गोसावी, रो. भारत ढोबळे, रो. डाॅ. मिलिंद लोटके, रो. किशोर निकते, रो. मयुर परिचारक, रो. संजय बंगलोरकर, रो. श्रीरंग बागल, रो. उमेश कोडगिरी, रो. डाॅ. संगीता पाटील, रो. डाॅ. वैभव सादिगले, रो. मिलिंद वंजारी, रो. डाॅ. उषा अवधूतराव, डाॅ. मेनकुदळे, रो. डाॅ. सादिक पाटील, प्रा. निशा करांडे, रो. जयप्रकाश जाधव आदीसह रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेजचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. रो. संगीता पाटील व विश्वास आराध्ये यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव सचिन भिंगे यांनी मानले.