मुंबई प्रतिनिधी उदय वाघवणकर
जे.आर मुंबई पब्लिक शाळा - डोंगरी, जे.जे.शताब्दी शाळा - भायखळा, के.पी.एम.पी.एस शाळा - कामाठीपुरा ह्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांवर वेगवेगळ्या विषयावर पथनाट्ये सादर केली.जे. आर.मुंबई पब्लिक - शाळेतील इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचे व्यसन या विषयावरील पथनाट्य अग्निशमन केंद्र - मेमेनवाड़ा येथे सादर केले.सदर पथनाट्यात उम्मेहानी ,मरियम खान, मोहंमद, झुबीया, अलिषा, फैझान, समीर, सोलेमान, मुस्तफा मर्चेंट आणि दिलकश खान हे विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते.जे .जे.शताब्दी मुंबई पब्लिक शाळेमधून बेटी बचाव बेटी पढ़ाव या विषयावरील पथनाट्य जे. जे. हॉस्पिल गेट क्र.२, बी, एम.सी, ऑफिस गेट क्र. ९ च्या समोर सादर केले.सदर पथनाट्यात दिपीका वाल्मिकी, ईसा मीर, जतीन वाघेला, ध्रुव वाघेला, जस्मिन मुल्ला, झैनाब सय्यद, हर्षित वाघेला, सौद इम्रान, अब्दुल रहमान आणि डिंपल सोलंकी हे विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते.कामाठीपुरा मुंबई पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रणाली ह्या विषयावरील पथनाट्य कामाठीपुरा ५वी गल्ली व ७वी गल्ली येथे सादर आले.
सदर पथनाट्यात प्रेम चलवादी, रेशमा माली, श्वेता साळवी, आयेशा उमतिया, फलक शेख, सिराज खान, तुबा शेख, झारा शेख, विनायक वाघेला, तहा शेख आणि शयान अन्सारी ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचा विषय, सराव, निवडक योग्य पात्रे, साधने व सहकार्य शिक्षक सानिया अन्सारी, पर्न रहाटे, जैद कवठेकर, सरोज प्रजापती, कोमल तुळसकर, प्रणिता गमरे, फरिसा दमानी, सहीमा मेमन, अमीर हमझा खान, मनीष पाल, रेश्मा म्हात्रे, सना खान, हफसा अन्सारी, मुद्दसीर अन्सारी आणि सोनम घागरे ह्या शिक्षकांनी केले.फझलानी आयेशाबाई संस्थेचे शैक्षणिक संचालक शेख बशारत हुसैन, बृहन्मुंबई महागर पालिका शाळा मुख्याध्यापिका रंजन हेलीया व कल्पना पार्गी शाळा समन्वयक अमी वेद, तस्नीम तेलवाला, शालेय प्रशासक समन्वयक नसरीन शेख, शाळा प्रमुख- फारुख खान, दिलीप चौधरी आणि सकीना छत्रीवाला, समुपदेशक महेक सुरमावाला व फिओनी कोठारी, शालेय प्रशासक फहीम अन्सारी, संपर्क अधिकारी श्रुती कांबळे या सर्वांच्या मार्गदर्शन व.निरीक्षणाखाली पथनाट्याचे सादरीकरण झाले.पथनाट्य स्थळाची शासकीय परवानगी घेवून त्या स्थळावर पथनाट्ये सादर करण्यात आली. लहान मुलापासून ते तरुण, वृद्ध पर्यंत पथनाट्य पाहण्यासाठी गर्दी जमली होती.उपस्थित नागरिकांनी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यासंदर्भात उत्तम अभिप्रायही दिले.विद्यार्थ्यांच्या सहअभिनय, पोस्टर, कृति, स्पष्ट आवाज, योग्य उच्च संवादातुन पथनाटकला परिणामकारकता प्राप्त करून दिली.