नवी मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
मुंबई येथिल सर जे.जे.हॉस्पिटल चा विद्यार्थ्यी, बुद्धिबळपटू ओमकार बालाजीराव पेटेकर यांनी अखिल भारतीय वैद्यकीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप च्या विद्यमाने खेळविण्यात आलेल्या भारतातील संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अत्यंत मानाची स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये ओमकार बालाजी पेटेकर हा स्पर्धकांतून तिसऱ्या क्रमांकाने यशस्वी होऊन तृतीय येण्याचा मान मिळवला. ग्रामीण साहित्यिक, कवी बालाजी पेटेकर सर यांचा ओमकार हा मुलगा असुन तो १० मे २०२३ पासून बिहार राज्यातील पाटणा येथे झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयीन चॅम्पियन शिप बुद्धिबळ स्पर्धेत अटीतटीच्या स्पर्धेतुन तृतीय क्रमांकाने यशस्वी झाला. त्याच्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याच्या मुंबई येथील सर जे.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व सर्व मित्र परिवारांनी त्याचे अभिनंदन केले.
यापूर्वीही ओमकार पेटेकर यांनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकत विभागीय व राज्य स्पर्धेत सुद्धा नवव्या क्रमांकाने बाजी मारली होती. संपूर्ण भारतातील सर्व राज्यांतील बुद्धिबळ स्पर्धकांशी खेळत. बिहार येथील पाटणा या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात आली. त्याच्या या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेतील यशासाठी परिसरातील मित्रपरिवार, हितचिंतकांकडुन शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.