तेजआधार सत्यशोधक वैश्विक नवयुग क्रांती बालिका आश्रमाचे संस्थापक नागनाथ पांढरे यांनी केले नकोशा मुलींचा जीव वाचविण्याचे आवाहन
पंढरपूर प्रतिनिधी
थोर समाज सुधारकांच्या, साधुसंतांच्या, महान पराक्रमी शूरवीरांच्या ,कर्मभूमीत जन्मलेले महाराष्ट्रवाले, सत्यशोधक वैश्विक नवयुग क्रांतीसाठी सर्वप्रथम पुढे आले असून गर्भातील व गर्भाबाहेरील निर्दोष नकोशी मुलींचा (म्हणजेच पुढच्या पिढीच्या आईचा) विशेष नाविन्यपूर्ण पद्धतीने जीव वाचवण्यासाठी पुढील काळात आपल्या संपूर्ण देशाला व जगाला दिशादर्शक ठरणाऱ्या संपूर्ण विश्वातील पहिल्या कन्यादान परिवर्तन सन्मान योजनेच्या तथास्तु पाळण्याचे आपल्या भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वास अनुसरून संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता गरजू नकोशा मुलींच्या व त्यांच्या आई बापाच्या तसेच वास्तव स्थितीतील सर्व प्रजेच्या व सरकारच्या हितरक्षणासाठी सध्याच्या काळातील खरी गरज व आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी नकोशा मुलींना सन्मानपूर्वक स्विकारण्याकरिता तथास्तु पाळण्याचे लोकार्पण करून इतिहासाला नोंद घ्यावी लागेल अशा नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम संकल्पनेतून 14 मे 2023 चा जागतिक मातृ दिन साजरा करून देशापुढे व जगापुढे वाखरी गावाची स्वतंत्रपणे व कौतुकास्पद ओळख निर्माण झाली आहे.
त्यासाठी नकोशा मुलींना सन्मानाने व प्रतिष्ठा पूर्वक स्वीकारून (पुढच्या पिढीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी) सध्याच्या काळातील प्रजेची व सरकारची खरी गरज व आवश्यकता पाहून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संपूर्ण विश्वातील पहिल्या कन्यादान परिवर्तन सन्मान योजनेच्या तथास्तु पाळण्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ पांढरे यांच्या मातोश्री पद्मिनी पांढरे व जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ सविता गोसावी यांच्या शुभहस्ते जागतिक मातृदिना दिवशी 14 मे 2023 रोजी श्री संत नारायण देवबाबा भक्त निवास चंद्रभागा एस.टी.स्टॅड समोर बायपास रोड पंढरपूर येथे लोकार्पण करण्यात आले. याबाबत अधिक माहितीसाठी मो. 9881361195 / 7972768987 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरीचे या सामाजिक युवा स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ पांढरे म्हणाले की सध्या आपल्या राज्यातील व देशातील मुली व महिलांना शाळा कॉलेज ऑफिस नोकरी व्यवसाय व इतर दैनंदिन कामानिमित्त घराबाहेर पडताना पुरुषांच्या काम विकारी वासनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःचा चेहरा झाकून घेतल्याशिवाय घराबाहेर पडणेच सध्या फार मुश्किल व अशक्य झाले असून स्व:बचावासाठी आवश्यक ती पुरेपूर दक्षता व खबरदारी घेऊनही छेडछाड, अपहरण, बलात्कार, खून अशा प्रकारच्या अत्याचाराची शिकार न बनता प्रत्येक मुली व महिला दररोज आप आपल्या घरी सुखरूप पणे परत येतीलच याची सध्या सरकार सहित कोणीही ठामपणे हमी व खात्री देऊ शकत नाही. ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
आपल्या केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याची व मदतीची अपेक्षा न करता सरकारच्या सदोष व अपुऱ्या प्रचलित कायद्याच्या पुढे जाऊन भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वास अनुसरून सर्वप्रथम आदिमाया शक्तीचे प्रतिरूप असणाऱ्या सर्वच वयोगटातील मुली व महिलांचा सन्मान करण्यासाठी स्त्रीभ्रूणहत्या रोखून स्त्री पुरुष जन्मदरात समानता आणणे कामी समविचारी लोकसभागाच्या बळावर शंभर टक्के यशस्वी ठरलेला वाखरी पॅटर्न पुढील काळात आपल्या संपुर्ण देशाला व जगाला दिशादर्शक ठरणारा असल्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या रोखणे कामी(म्हणजेच पुढच्या पिढीच्या निर्दोष आईची) केवळ अपत्य बंदी कायद्याच्या भीतीमुळे व पुत्रप्राप्तीच्या इच्छापूर्ती करता गर्भातील व गर्भाबाहेरील मानव जातीतील अत्यंत कमजोर घटक असणाऱ्या निर्दोष नकोशी मुलींना अत्यंत गुप्तपणे विना तक्रार भोगाव्या लागत असणाऱ्या मृत्युदंडाच्या शिक्षा थांबवण्यासाठी स्त्री पुरुष जन्मदरातील नैसर्गिक समतोल अबाधित राखण्याकरिता सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या संपूर्ण देशातील प्रत्येक जिल्ह्यात आशावर्कर्सताई, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील स्वयंसेविका तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान शंभर नकोशी मुलींच्या शुभचिंतकांचा प्रत्येक वर्षी जागतिक मातृदिना दिवशी सन्मानचिन्ह व गौरव पत्र देऊन सन्मानित करणे व त्यांना चांगल्या प्रकारे काम करण्यास बळ देणे हे गरजेचे असून पुढील वर्षीच्या 2024 च्या जागतिक मातृदिनापासून सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यापासून या विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.
चालू वर्षी फक्त वाखरी गावातील व पंढरपूर तालुक्यातील आशावर्कर्सताई, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील स्वयंसेविका, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील नकोशी मुलींच्या सर्व शुभचिंतकांचा गावचे सरपंच ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ सविता गोसावी यांच्या उपस्थितीत संघर्ष नेहरू युवा मंडळ वाखरी संचलित तेजआधारसत्यशोधक वैश्विक नवयुगक्रांती बालिका आश्रम शाखा क्रमांक 1पंढरपूर या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या व राष्ट्रीय ऋणमुक्तीच्या भावनेतून सन्मानित करण्यात आले.
आपल्या सरकारने बनवलेल्या अपत्य बंदी कायद्याच्या भीतीपोटी अनेक कुटुंबाची मुली सांभाळण्याची ऐपत व इच्छा असूनही केवळ पुत्रप्राप्तीची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून पुत्रप्राप्तीच्या इच्छापूर्तीकरिता स्वतःच्या आईने तिच्या मजबुरीमुळे स्वतःचे नाव देण्याचे व स्वतःचे दूध पाजण्याचे नाकारलेल्या नकोशा मुलींच्या दुधाची व्यवस्था करण्यासाठी आई नंतरचा दूध पिण्याचा हक्काचा व सुरक्षित दुसरापर्याय त्या भुकेजलेल्या गरजू नकोशीं बाळांना तातडीने दुध उपलब्ध व्हावे म्हणून मंगळवेढा तालुक्यातील सुवर्ण क्रांती महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने दोन दुधाळ देशी गाई या नकोशा मुलींच्या आश्रमाला देणगी स्वरूपात देण्याचे सामाजिक कार्यकर्ते ऍड. दत्तात्रय खडतरे यांनी जाहीर केले.
सदरहू कार्यक्रमास वाखरी गावा बरोबरच पंढरपूर तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, विविध महिला बचत गटाच्या स्वयंसेविका, जिल्हा परिषद सदस्या सौ .सविता गोसावी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वाखरीचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेकानंद घोडके, रंगनाथ घोडके , सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील नकोशा मुलींचे वाखरीतील व पंढरपूर तालुक्यातील सर्व शुभचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ पांढरे यांनी केले सूत्रसंचालन रेखा चंद्रराव यांनी केले तर उपस्थितांचेआभार संस्थेचे खजिनदार शाकीर मुजावर यांनी मानले.