पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचाअर्ज मोबाइलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीतून मदतीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.इच्छुकांनी या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल.
त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाउनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅनकरून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.