पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणीचा सभासद एकनिष्ठ असून विरोधकाच्या अप्रचाराला बळी पडणार नाहीत. असा विश्वास पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश देठे यांनी व्यक्त केला.
सहकार शिरोमणी साखर कारखान्याची पंचवार्षिकनिवडणुकीच्या प्रचाराची गावोगावी घोंगडी बैठकीनिमित्त जावून सभासदांशी हितगुज करुन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कल्याणराव काळे सध्या फिरत आहेत पिराची कुरोली येथील विचार विनिमय बैठकीत पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश देठे बोलत होते.
यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की, लोकांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमच्यावर आंदोलन केल्याने आमच्यावर गुन्हे दाखल आहेत, गावातील सभासद, नसणाऱ्या राजकीय नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या बगलबच्चाना खर्चाला पैसे देऊन गावा गावामध्ये भांडण लावण्याचा काम सुरूआहे याची देखील सभासद बांधवांनी शहानिशा करून विचार करण्याची वेळ आहे,, गावागावात पूर आला की आम्ही नदीच्या पाण्याने लोकांच्या घराचे नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या संदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांच्याशी पंचनामा करण्यापासून ते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपूर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, सध्या विरोधकांकडून अपप्रचार होत आहे दिशाभुल करण्याचे प्रकार मोठया प्रमाणात सुरु आहेत.
मुंढेवाडी येथील एक कार्यकर्ता गैरसमज करून मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले परंतु तेच कार्यकर्ते हे आमचे सहकारी असून चार तासाच्या आत पश्चाताप झाला अजून गैरसमज दूर करून जोमाने काळे परिवाराचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे कल्याणराव काळे साहेब यांनी सांगितले.
आज पिराची कुरोली, केसकरवाडी, शेंडगेवाडी, भाळवणी, धोंडेवाडी, सुपली आधी भागात घोंगडी बैठक पार पडल्या. यावेळी रामचंद्र कौलगे, पांडूरंग कौलगे, तुकाराम माने, गणेश शिंदे, परमेश्वर लामकाने, बाळासाहेब लामकाने, हरिदास कौलगे, रणजित लामकाने, शरद सावंत, महादेव सावंत, सिध्देश्वर देशमुख, अनिल देशमुख, गुलमहंमद मुजावर यांचेसह सभासद व कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.