मंगळवेढा प्रतिनिधी
आज दिनांक 27/ 5/ 2023 रोजी पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघांमध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते व शिक्षक मतदार संघाचे मा. आमदार दत्तात्रय सावंत यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
आमदार महोदय यांनी दहावी बारावीनंतर करिअरच्या संधी तसेच रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थांना स्वावलंबी बनवणे आहे हे या संस्थांचे उद्दिष्ट असते.
तसेच आयटीआय व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. आयटीआय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये एक वेगळीच कला असते आणि ती कला त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले पाहिजे, आयटीआय केलेले विद्यार्थी नोकरी सोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचारही करू शकतात.
या कार्यक्रमा करिता जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी भालचिम , आय टी आय, पंढरपूरचे प्राचार्य ओंबासे, तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विजय नवले ,नंदकुमार दुपडे,संतोष मोरे,अभिमान मोरे,प्रसाद भैया कळसे, भास्कर घायाळ, अमिन भाई शेख, अनिकेत देशमुख,आदी मान्यवर उपस्थित होते.