पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणी कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीत वाखरी गावच्या माजी सरपंच श्रीमती सुशीलाताई भारत जगताप यांनी महिला राखीव गटातून विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील व डॉ. बी. पि. रोंगे यांच्या गटातून अर्ज दाखल केला आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याचा सर्वत्र बोलबाला असून त्याचा फायदा पॅनल ला होईल असे बोलले जात आहे. त्या सध्या काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करत आहेत.
त्यांना शेतकरी, कामगार प्रश्न यांच्या विषयी जाण असल्याने त्याचा फायदा होईल.या वेळेस अर्ज भरताना आनंद पाटील, अमरजीत जगताप, विलास जगताप, संभाजी शिंदे, प्रकाश गाजरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.