*बाल गीत-गाणी* (६)
--------------------------------
काव्य प्रकार - बालगीत
*शीर्षक - कासव आणि ससा*
चला मुलांनो, चला चला रे, पारावर या बसा
तुम्हा सांगतो कथा एक मी, कासव आणि ससा ||धृ.||
वनात एका रहात होते, मित्र जिवाचे सखे
इकडून तिकडे विहरत होते, आनंदाने सुखे
मंद गतीने कासव चाले, वेगे पळतो ससा ||१||
गर्व जाहला मनी सशाच्या, तो गर्वाने फुले
शोभत नाही मित्र मला तू, कसे न तुजला कळे ?
मंदगती तू, मूर्ख भासतो, असा वेंधळा कसा ? ||२||
_"कासवाला आला राग, दूर होती सुंदर बाग
तो म्हणाला सशाला, भेट देऊ बागेला
परंतु आहे एक अट, जो पोहचेल तेथे झट,
जिंकेल तो ठरेल मोठा, हरेल त्याला मारु सोटा"_
वेडा आहे किती मित्र हा, ससा म्हणाला मनी
कबूल आहे शर्त मला रे, साक्षी ठेऊ कुणी
साक्षी ठेऊन कोल्होबाला, धावू लागला ससा ||३||
हळूहळू मग कासव चाले, जाण्या बागेपाशी
ससा पळाला पुढे परंतु, गंमत झाली खाशी !
दिसे तयाला वृक्ष फळांचा, एक पुढे छानसा ||४||
_"ससोबाने पाहिले वळून, कासव येत होते दुरुन
मनात हसली सशाची स्वारी, चला करु थोडी न्याहारी,
ससोबाने खाल्ले खूप, मग झोपले चिडीचूप
झोप लागली त्याला छान, कासवाने केली तान"_
पुढे जाऊनी बसले कासव, मजेत बागेपाशी,
खूष होऊनी शांत बैसले, गंमत झाली कशी ?
सोटा आता बसेल म्हणूनी, पळून गेला ससा ||५||
गर्व कधीही करु नका रे, असा मुलांनो बरे
घर गर्वाचे होते खाली, तुम्हा सांगतो खरे
आवडली का कथा तुम्हाला ? सांगून गाली हसा ||६||
-- रविंद्र सोनावणी
मो. क्र. +९१ ८८५०४ ६२९९३
टिटवाळा, पूर्व
---------
*अल्प परिचय*
नाव : रवींद्र प. सोनावणी
निवास : G03, भूमिक
दर्शन, गणेश
मंदिर रोड,
उमिया काॅम्पलेक्स,
टिटवाळा पूर्व -
४२१६०५
भ्रमणध्वनी :
९२२२०५३४३५/ ८८५०४६२९९३
कार्यक्षेत्र: राष्ट्रीय संगीत
नाट्य केंद्र
नरिमन पॉईंट,
मुंबई -
४०००२१
ध्वनी मुद्रण +
प्रोजेक्शन
शाखेत
१९७७-२०१३
कार्यरत
छंद : वाचन- थोरांची
आत्मचरित्र -
कविता
कै. पु. ल. देशपांडे
+ कै. अशोक रानडे
( या दिग्गजांचा सहवास)
१० फेब्रुवारी - २०१३ निवृत्त को. म. सा. प पाली बल्लाळेश्वर काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक ( २०१२)अनेक कवि संमेलनात सहभाग.
---------------
*संकल्पना, मांडणी व संकलन*
*नवनाथ अर्जुन पा गायकर*
*आहुर्ली,पो.सांजेगाव,ता.ईगतपुरी, जि.नाशिक.४२२ ४०२*
*मो.नं. ९८८१३२९७०९,९७६३८२७७०८*
*ईमेल-9nathgaikar@gmail.com*
( *आपल्याला बाल गीत-गाणी कशी वाटली हे अवश्य कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियाचीं नक्की वाट पाहु....*🙏)
--------------------------------------------------------
चित्र काढून सुंदर रंगवा