शेळवे प्रतिनिधी
पूजनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार शेळवे येथील ग्रामपंचायत च्या कर्तव्यदक्ष सदस्या इंदुमती बाळासाहेब गाजरे व आशा सेविका शोभा शंकर देवकर यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला.
आज शेळवे ग्रामपंचायत कार्यालयात पूजनीय आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली,प्रसंगी शेळवे ग्रामपंचायत चे सरपंच सुनिता अनिल गाजरे व उपसरपंच किरण देवचंद गाजरे तसेच ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्के,डॉ. शशिकांत नागटिळक तसेच अनिल गाजरे, शांताराम गाजरे गुरुजी,भारत गाजरे, नामदेव काका गाजरे,आप्पासाहेब भोसले,बाबासाहेब गाजरे,शंकर गाजरे ,समाधान भैय्या गाजरे,अमोल लोकरे,सर्व अंगणवाडी व आशा सेविका तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.