पंढरपूर प्रतिनिधी
एमआयटी विश्वशांती गुरुकुल वाखरी पंढरपूर जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून यामध्ये विज्ञान शाखेच्या कुमारी प्रज्ञा जीवन कुलकर्णी हिने 90 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे ,तर वाणिज्य शाखेमध्ये कुमारी माही राजेंद्र बजाज हिने 87.67% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे
दोन्ही विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून या कामी विद्यार्थ्यांची चिकाटी , शिक्षकांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्या सौ. कार्तिश्वरी मॅडम यांनी वेळोवेळी घेतलेल्या बहुमोल परिश्रम विद्यार्थ्यांच्या कामी आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या सौ. कार्तिश्वरी मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*विज्ञान विभाग*
प्रथम क्रमांक- कुमारी प्रज्ञा जीवन कुलकर्णी 90%
द्वितीय क्रमांक- कुमारी श्रावणी राम कुराडे 83.67%
तृतीय क्रमांक- कुमारी समृद्धी नवनाथ नागणे 82.83 %
चतुर्थ क्रमांक- इंद्रजीत किरण माळी 81.17%
पाचवा क्रमांक- कुमारी गीतांजली गजानन नलवडे 79.83%
*वाणिज्य विभाग इंग्लिश मीडियम*
प्रथम क्रमांक- कुमारी माही राजेंद्र बजाज 87.67 %
द्वितीय क्रमांक- कुमार तनिष सफल गांधी 82. 17 %
तृतीय क्रमांक- कुमारी आकांक्षा विवेकराज साळुंखे 81.50%
चतुर्थ क्रमांक- कुमार केतन विनोद जाधव 78.67%
पाचवा क्रमांक- कुमारी प्रणिता तात्यासाहेब नलावडे 78.00 %.
यावेळी विद्यार्थी,पालक,शिक्षक,यांचे अभिनंदन केले.