पंढरपूर. प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आई.ई.टी.ई) यांच्या संयुक्त विद्यमाने "सेन्सर आणि ऍप्लिकेशन“ या विषयावर दिनांक १९ व २० मे २०२३ या कालावधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. असल्याची
माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. राहूल पोळ yani सध्याच्या युगात अर्डिनो आणि रास्पबेरी पाय चे महत्व संगितले, अर्डिनो आणि रास्पबेरी पाय हे सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करायचे, सेन्सर चे कार्य , सेन्सर चे महत्व, अर्डिनो आणि रास्पबेरी पाय मध्ये प्रोग्रामिंग कसे करायचे याविषयी डाॅ. पोळ यांनी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताxना म्हणाले, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन डाॅ. कैलाश करांडे यांनी केले.
या प्रोग्रॅम अंतर्गत तृतीय वर्गात शिकणाऱ्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वैभव गोडसे, प्रा. सोनाली गोडसे सह विदयार्थी प्रतिनिधी म्हणून अशोक कदम, संकेत नागणे, सोनाली मोटे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परीश्रम घेतले.