मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी आज सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते मला निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावता परिषदेचे प्रदेश महासचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रविण गाडेकर, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश सचिव शरद माने, प्रदेश कोषाध्यक्ष पारस परमार, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड.गोपाळ बुरबुरे, मराठवाडा विभाग अध्यक्ष शिवानंद झोरे, मुंबई विभाग संपर्कप्रमुख अशोक माने, मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख विष्णूपंत खेत्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप चौरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उद्घव भुजबळ, बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, संभाजीनगर महानगर अध्यक्ष साईनाथ जाधव, ठाणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा भोपळे, राज गाडेकर, तुषार राख, चंद्रकांत जाधवर, संजीव निवडुंगे आदी जण उपस्थित होते.