*बाल गीत-गाणी* (२)
--------------------------------
*राजा फळांचा*
आला आंबेवाला हातगाडी घेऊन आंबे विकायला
देतो आवाज सर्वांना या हो गोड गोड आंबे घ्यायला
एकदा घ्याल तर पुन्हा याल स्वस्त माल चाखायला
हापूस, पायरी, केशर, लंगडा, दशहरा न्यायला
-१-
सर्वांना गोटी आंबा रसाला लय भारी चवीला
लालबाग, मलकोबा, मानकुरा मस्त स्वादाला
कापून खा वा चोखून खा पृथ्वीच्या या अमृताला
तोतापुरी सर्वांमागून रसनेच्या तृप्तीला
-२-
आम्रपाली, नीलम, चिन्नारसम, स्वर्ण रेखा ला
कसे विसरू साखरगोटी बदाम रायवळा
लहान थोर स्त्री पुरूषांना लावे वेड जीवाला
फळांचा राजा म्हणून मिरवितो आंबा आपला
-३-
-------
*कवी*
बाबू फिलीप डिसोजा
हिमगौरी बिल्डिंग२१, सेक्टर २१,स्कीम१०, यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
मो. 9890567468
---------
*संकलन*
*नवनाथ अर्जुन पा गायकर*
*आहुर्ली,पो.सांजेगाव,ता.ईगतपुरी, जि.नाशिक*
*४२२ ४०२*
*मो.नं. ९८८१३२९७०९*
*९७६३८२७७०८*
*ईमेल-9nathgaikar@gmail.com*
( *आपल्याला बाल गीत-गाणी कशी वाटली हे अवश्य कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियाचीं नक्की वाट पाहु....*)
------------------------------------------------------------
चित्र काढून सुंदर रंगवा