पंढरपूर प्रतिनिधी
लोकराजा राजषी छत्रपती शाहू महाराज स्मृति दिन पंढरपूर मधील सौ.सुनेत्राताई पवार यांचे शैक्षणिक संकुलात असणाऱ्या श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित माताजी निर्मलादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक ,मातोश्री ईश्वरामा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर यांनी एकत्रपणे संस्थेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात प्रशालेच्या प्राचार्या गायकवाड एन.व्ही. मुख्याध्यापक कवडे एस. एल. व प्रशालेच्या नाईक सुधा बाबुराव इंगळे यांचे शुभहस्ते प्रतिमेस पुष्पगुच्छ व पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी भगवान श्री सत्य साई यांच्या मातोश्री ईश्वराम्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी राजषी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर बोलताना अभ्यासक अलनदिप टापरे म्हणाले की दूरदर्शी व सामाजिक सुधारणांचे प्रतीक असणारे राजषी शाहू महाराज हे मराठी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे राजे होते. जनतेला समान हक्क व समान संधी मिळाल्या पाहिजेत . यासाठी त्यांनी समाजातील अस्पृश्य व्यवस्था नाहीशी करून जाती -धर्मातील भेदभाव बेकायदेशीर ठरवून ब्राह्मणेतर चळवळीच्या उभारणीत त्यांचे योगदान मोठे आहे असे सांगून ती परफॉर्मिंग कलांचे उत्तम संरक्षक असल्याचे सांगितले.
पुढे सुवर्णा जगदाळे म्हणाल्या की शिक्षणाचे महत्त्व ओळखून राजाने गोरगरीब व सर्व जाती-धर्माच्या मुलां मुलींसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करून शिक्षणाची खरी गंगोत्री सर्वांच्या दारी नेली. शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयाच्या कार्यशाळा आयोजित करून व जनतेतील रसिकता ओळखून गायन, चित्र, नाट्य, शिल्प, वादन इत्यादी कलांचे ज्ञान देऊन कोल्हापूरची कलानगरी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. असे सांगून रयतेचा दुःख जाणणारा राजा होता असे सांगितले.
कार्यक्रमासाठी रुक्मिणी बँकेच्या चेअरमन सविता लोखंडे, संचालक जयश्री खडतरे यांचे सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख विभावरी डुबल, कुमुदिनी सरदार, वैशाली कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश आगवणे यांनी केले तर आभार सोमनाथ साळुंखे यांनी मानले.