पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वसतिगृह अधीक्षक अमोल हुंगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्वांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराज यांना अभिवादन केले. यावेळी शाहू महाराजांच्या जीवनावर तुकाराम मस्के यांनी भाषण केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाराध्ये यांनी विद्यार्थी केंद्रभागी ठेवून शिक्षकांनी काम करावे व शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाई मुलाणी यांनी केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे, विभागप्रमुख संजय पवार,तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, अशोक पवार,शिवाजी येडवे,महादेव रणदिवे,मुख्य लिपिक हनुमंत मोरे, अधीक्षक अमोल हुंगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. देविदास चेळेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.