भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी ता. पंढरपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी. या विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून सदर परीक्षेमध्ये प्रथम ,द्वितीय, व तृतीय क्रमांक मुलींनी पटकावले असून विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यालयातून एकूण 221 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्य 4 विद्यार्थी प्रथम श्रेणी 131 द्वितीय श्रेणी 81 व पास श्रेणीमध्ये 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा 100 %निकाल लागलेला असून निकालाची परंपरा कायम राखली आहे.
प्रथम क्रमांक
कु.लिंगे साक्षी नाना 87.33%
द्वितीय क्रमांक
कु.कारंडे प्रतीक्षा भीमराव 78.83%
तृतीय क्रमांक
कु. भोईटे योगिता दत्तात्रेय 76.67%
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे प्राचार्य श्री गायकवाड एन एम, सरपंच राजकुमार पाटील, उपसरपंच सविता लोखंडे व सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ तसेच पालकांमधून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.