सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरसह इतर जवळच्या जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांना स्पर्श (SPARSH) बाबतची माहिती देण्यासाठी तथा हयातीच्या दाखले तसेच निवृत्ती वेतनाबाबत माहिती व त्यासंबंधित अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दोन दिवसीय शिबिर घेण्यात आले.
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन कर्नल नवीन बेंद्रे (निवृत्त) OIC ECHS Polyclinic, Solapur यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्षा लेखामहानियंत्रक यांच्यामार्फत PCDA(Pension), प्रयागराज यांच्या टीमचे दोन प्रतिनिधी, Records Artillery, Nashik यांचे मार्फत ०१ JCO व ०१ NCO, Bombay Engineer Group, Pune यांच्या मार्फत ०२ NCO, Records Mech Infantry यांचे मार्फत ०१ JCO व ०१ NCO, २ Wingh Airforce Pune यांच्यामार्फत ०१ NCO स्टेशन हेडक्वार्टर मार्फत 1 NCO तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बाळीवेस शाखा यांच्यामार्फत ०४ प्रतिनिधी उपस्थित होते.
या शिबिरात सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे ५४९ निवृत्तीवेतन धारक माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व त्यांचे अवलंबीत उपस्थित होते. सदर टीम कडून उपस्थितांना त्यांच्या स्पर्श व इतर अडचणींचा निपटारा अतिशय चांगल्या प्रकारे करुन माजीसैनिक / माजी सैनिक विधवा पत्नी यांचे मनोबल वाढविले.
प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे गुरुनाथ कुलकर्णी यांनी तर आभार सुनिल जाधव यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुनिल जाधव, लक्ष्मण कोळी, गुरुनाथ कुलकलर्णी, दिनेश नागणे, सतीश रासकर, अप्पासाहेब कोडग, उमेश राठोड, एम यू मुल्ला, राजेसाहेब शेख, मिथुन ताकमोगे, गणपत आडद आदिंनी परिश्रम घेतले.