पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे यांचे चिरंजीव आनंद शिवाजी येडवे याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये नेत्र दीपक यश मिळाले आहे. त्याला 180 गुण मिळाल्याने तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.त्याच्या या यशाबद्दल विवेक वर्धिनी प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांचे हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सहशिक्षक राजूभाई मुलाणी व सर्व परिवारातील सदस्य उपस्थित होते .राजुरी शाळेतील त्याचे मार्गदर्शक शिक्षक, मित्रपरिवार यांच्याकडून आनंद येडवे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.