पंढरपूर प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिर 20 दिवसाचे पुर्ण झाले. दिनांक 31 मार्च 2023 रोजी शाहिरी प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला या समारोप प्रसंगी 36 जिल्ह्यातून आर ओ बी ग्रुपचे सर्व कलावंत लीडर जिल्ह्यातील कलावंत उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनाचे संचालक विभीषण चवरे, भारुड सम्राज्ञी चंदाताईची तिवाडी, बाळासाहेब पोळ, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शाहीर विजय व्यवहारे ,महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश खाडे, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी , प्राध्यापक सयाजीराव गायकवाड, कोल्हापूर विद्यापीठ परशु पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर संचालक शाहीर सुभाष गोरे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात पांडुरंगाच्या पावन नगरीत पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाने शाहिरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नवयुवक शाहीर घडावेत शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन व्हावी म्हणून शिबीर संचालक पदी माझी निवड केली मी प्रामाणिकपणे सांगतो या शिबिराच्या माध्यमातून पुढील युवा पिढी ही शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण हे आमचे ब्रीद वाक्य नक्कीच सार्थ ठरवणारी आहे.
शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन व्हावी म्हणून सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक विभीषण चवरे , शाहीर सुभाष गोरे यांची शाहिरी प्रशिक्षण शिबिर संचालक पदी निवड केली.
दिपक आबा साळुंखे पाटील म्हणाले की शाहिरी लोककलेची परंपरा ही टिकून राहावी व शाहिरी लोककला जतन व संवर्धन व्हावी यासाठी असे शाहिरी प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाने वर्षानुवर्षे घेऊन शाहिरी या लोककलेला उत्तेजन द्यावे मी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो असे शाहीर महाराष्ट्रात तयार झाले तर महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रामध्ये मनोरंजनातून शाहिरी पोवड्यातून प्रबोधनात्मक जनजागृती शाहिरांच्या माध्यमातून होऊ शकते हे आज अनुभवायला मिळाले सर्व विद्यार्थ्यांचे शिबिर संचालकाचे कलावंतांचे अभिनंदन करून दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांनी आपल्या भाषणात सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व अभिनंदन केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे व पंढरपूर येथे आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे संचालक शाहीर सम्राट सुभाष गोरे यांचेही आभार मानले असे कार्यक्रम सांस्कृतिक विभागाने वेळोवेळी राबवून महाराष्ट्राची लोककला जतन व संवर्धन करावी अशी इच्छा व्यक्त केली.
शिबिर संचालक शाहीर सुभाष गोरे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात पांडुरंगाच्या पावन नगरीत पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाने शाहिरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नवयुवक शाहीर घडावेत शाहिरी ही लोककला जतन व संवर्धन व्हावी म्हणून शिबीर संचालक पदी माझी निवड केली मी प्रामाणिकपणे सांगतो या शिबिराच्या माध्यमातून पुढील युवा पिढी ही शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण हे आमचे ब्रीद वाक्य नक्कीच सार्थ ठरवणारी आहे.
या कार्यक्रमाचा समारोप करताना शिबिरार्थी 20 विद्यार्थी होते.या विद्यार्थ्यांनी 20 दिवस घेतलेले प्रशिक्षण यांचे व्यासपीठावर सादरीकरण " व्रत शाहिरी लोककलेच लेन महाराष्ट्राचं " सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला समारोप अतिउत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर प्रतापसिंह गोरे, विक्रम गोरे, विशाल मागाडे, भैय्या पांडे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शाहीर उत्तम गायकर यांनी केले तर आभार शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी मानले.