भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज मतदान झाले. ही निवडणूक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली आहे. यामध्ये परिचारक गटाचे पाच संचालक बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित संचालक मंडळासाठी सर्व मतदारांनी भरघोस असे मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावला.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त भाळवणी मतदान केंद्रावर झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे.
ग्रामपंचायत मतदार एकूण संख्या 174 त्यापैकी मतदान झालेली मतदारांची एकूण संख्या 172 एकूण 98.85% मतदान झाले आहे.
सोसायटी मतदारसंघ 415 असून त्यापैकी 411 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.एकूण झालेले मतदानची टक्केवारी 99.03 % आहे.
मतदारांनी उन्हामुळे सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदारांनी कोणत्या संचालक मंडळास कौल दिला आहे हे निकाल लागल्यावरच समजू शकेल.