पंढरपूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून, पंढरपूर येथे अखिल भारतीय (निमंत्रित )शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक ,श्री शिरीष सरदेशपांडे होते.
याप्रसंगी बोलताना श्री प्रशांतराव परिचारक यांनी अखिल भारतीय स्तरावरील शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल पंढरपूर व्हॉलीबॉल संघातील सर्व सदस्यांचे कौतुक केले. अजिंक्य क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पंढरपुरात विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. मंडळाच्या माध्यमातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याद्वारे पंढरपुरातील स्थानिक खेळाडूंना उत्तम खेळाडूंचा,कौशल्यपूर्ण खेळ पाहण्यास मिळावा व नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे साहेब यांनी पंढरपुरातील सर्व नागरिकांना व्हॉलीबॉल स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.
या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले ऑल इंडिया शूटिंग व्हॉलीबॉल फेडरेशनचे सचिव श्री रविंद्रजी तोमर यांनी पंढरपूरच्या पवित्र भूमीत या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करून प्रेक्षकांना आनंद द्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संतोष पाटील सर ,चेतन धनवडे सर, प्रा. सुभाष मस्के सर, व राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, अमृता माने ,शिवानी यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळामध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल भारतीय व्हॉलीबॉल संघाचे उपकर्णधार जयंत खंडागळे यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे सर,संचालक लक्ष्मणतात्या धनवडे,जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने सर, मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर अरुण फुगे साहेब, मा. नगरसेवक गणेश अधटराव, मा.नगरसेवक विक्रम शिरसट, अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे,महाराष्ट्र शूटिंग व्हॉलीबॉल फेडरेशनचे सचिव विष्णू निकम, कार्याध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर.व्हॉलीबॉल खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते सदाशिवराव माने व राजेंद्र मोहिते तसेच आंतरराष्ट्रीय पंच जावेद मनोरे, अरविंद पाटील, सुरेश पाटील, रफिक मोहम्मद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुभाष मस्के यांनी केले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश संघाने प्रथम क्रमांक, उत्तराखंड संघाने द्वितीय क्रमांक, महाराष्ट्र (जयंत Red) संघाने तृतीय क्रमांक मिळवला.सर्व विजेत्या संघांना तहसीलदार सुशील बेल्हेकर,युवा नेते प्रणव परिचारक,समाधान घुटुकडे साहेब,अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे,धनंजय डिकोळे, अर्बन बँकेचे संचालक एस.पी.कुलकर्णी,हरिष ताठे, मनोज सुरवसे,सोमनाथ होरणे,अमित मांगले,अनंत कटप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष शशी भोसले, सचिव नागनाथ क्षिरसागर,गजेंद्र पवार सर, संतोष गायकवाड, सोमनाथ कराळे,राहुल शिंदे साहेब,सखाराम भराटे,राजेंद्र अष्टेकर, मामा जगदाळे सर,नारायण देशमुख सर,विजय मोटे,सागर खाडे,हरी परदेशी,अमोल शिर्के,रेवण चंदनशिवे, राहुल दळवी सर,तुकाराम गुळुमकर, माऊली कुंभार, वल्लभ पांढरे,अजित मोरे ,प्रताप मुळे, संतोष पाटोळे, विकी साळुंखे, संदीप खेडकर, आनंद भोसले, सौदागर थोरात, जालिंदर शेलार सर, शामराव शिंदे शामराव माने गौतम सर ,हारचंद पावरा, सुरेशभाऊ चौगुले, रघुनाथ अधटराव, कदम साहेब, लक्ष्मण सातपुते, दादासाहेब मोहोळकर, रावसाहेब देशमुख, सुनील गाडे, शिवाजी भोसले ,सचिन पाटील, चंद्रकांत इंगळे साहेब,प्रकाश डबीर ,कार्तिक ,महाजन साहेब यांनी अथक परिश्रम घेतले.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कदम व दीपक इरकल यांनी केले. स्पर्धेच्या उत्तम संयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल गजेंद्र पवार सर यांनी सर्वांचे आभार मानले.