श्रीराम प्रतिष्ठान करकंब संस्थेच्या माध्यमातून जपला जातोय सांस्कृतिक वारसा
करकंब प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठान करकंब यांचे वतीने श्रीराम संगीत महोत्सवात इंडियन आयडॉल उपविजेता जगदीश चव्हाण आणि सुरेल गायिका भक्ती साळुंखे यांच्या सुमधुर स्वरांनी अभंग, हिंदी मराठी चित्रपट गीतांची बहारदार मेजवानी सादर झाली
सुरुवातीला श्रीराम प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य प्रभाकर टेके प्रभाकर रसाळ संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे उपाध्यक्ष संतोष बुगड सचिव विजय भागवत मा.अध्यक्ष धनंजय इदाते कलाकार जगदीश चव्हाण आणि भक्ती साळुंखे आणि सन्माननीय सदस्य यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली
श्री गणेशाच्या वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करत राम जन्मला ग सखे, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, रामावंदने नंतर मराठी हिंदी चित्रपट गीत सादर करत त्यामध्ये एक जिंदगी,जीव रंगला,चिंब पावसानं,मेघारे मेघारे,मेरी आवाज ही पहचान है.लल्लाटी भंडार,लंबी जुदाई, तुझ्या रुपाच चांदणं,गार डोंगराची हवा,आदी सदाबहार गाण्याने करकंबकर रसिकांना मंत्रमुग्ध करत हिंदी मराठी चित्रपट गीतांची मेजवानी दिली, कार्यक्रमाला निवेदन संदीप पिटके,सिंथेसाईजर संदीप डावरे,तबला गणेश शिंदे,एक्टोपॅड जयेश घोलप,ढोलक,अनिल खैरनार यांनी सुंदर साथसंगत करत बहार आणली, प्रास्ताविक संजयकुमार म्हेत्रे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत मिलिंद उकरंडे प्रभाकर रसाळ,संतोष टकले,धनंजय इदाते संतोष बुगड नवनाथ आलेकर सुरेंद्र इदाते, संजीवकुमार म्हेत्रे राजेंद्र टकले प्रभाकर टेके, दत्तात्रय इदाते,दयानंद आलेकर,शितल भरते, दत्तात्रय लोटके,अशोक म्हेत्रे विशाल बोधे,मोहन बोधे,आदी सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले.
रामनवमी दिवशी परंपरेनुसार भजन आणि फुलाचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने श्रीरामाची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे