पंढरपूर प्रतिनिधी
वेदांत केसरी,ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री.रंगनाथ महाराज यांच्या जीवन चरित्राचे लेखन मी यापूर्वीच केले आहे. या चरित्राची पहिली व दुसरी आवृत्ती यापूर्वी प्रकाशित झाली होती.
पंढरपूर येथे गुरुवर्य श्री.रंगनाथ महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या औचित्याने या जीवनचरित्राची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा योग आला.
महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नामदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते व पंढरपूरचे माजी आमदार श्री.प्रशांतराव परिचारक, जिंतूरच्या आमदार सौ.मेघनाताई बोर्डीकर-साकोरे, परभणीचे खासदार श्री.संजय उर्फ बंडू जाधव, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष श्री.नंदकुमार गादेवार, महासचिव श्री.गोविंद बिडवई, बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री.भानुदास वट्टमवार, ह.भ.प.श्री.डॉ.श्री.यशोधन महाराज साखरे, ह.भ.प.डॉ.श्री.जयवंत महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीराम महाराज बनवसकर, ह.भ.प.श्री.चिदंबरेश्वर महाराज साखरे,सोनपेठ समाज संस्थानचे अध्यक्ष श्री.नागनाथ सातभाई,या पुस्तकाचे प्रकाशक श्री.बाळकृष्ण तथा कृष्णा सुरशेटवार, आश्रयदाते श्री.रजनीश कवठेकर, श्री.शिरीष पारसवार, श्री.दिगंबर तथा आप्पा गडम, श्री.बालाजी कंकणवार, श्री.राजेंद्र वट्टमवार, श्री.संजय कोले, श्री.संजय उर्फ बाळासाहेब कौलवार,श्री.ज्ञानेश्वर जगलपुरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. गुरुवर्य रंगनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळेच हे कार्य पूर्ण झाले असेच मी समजतो. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो