हिंघणघाट तालुका प्रतिनिधी आकाश दुर्गे
सिद्धार्थ बुद्ध विहारात येथे कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक बुद्ध वंदनेने झाली . वैज्ञानिक क्रांतीचा संदेश देणारे सम्यक संबुद्ध यांच्या प्रतिमेला पोर्णिमा बोरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले . देवानाम प्रियदर्शि सम्राट अशोकाच्या प्रतिमेला शोभा डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण केली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संगीता दुर्गे यांनी पुष्पहार अर्पण केली .
ज्योती मानकर , संस्कृती दुर्गे , जयवर्ष झाडे , नंदिनी कांबळे , सद्धमिका झाडे , स्वप्निल दुर्गे नयांनी सर्व उपस्थित आमंत्रित तथा निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . उपस्थित धारकांनी सुरेख असे सुंदर गीत सादर केले . त्याने नाव आहे . ' ' पावित्र्यता तू सदा बणाये रखणा ' ' .
लगेच दुसरा सत्र सुरु झाला . भारतीय बौद्ध महासभेचे तालुका महासचिव , केंद्रीय शिक्षक , आयुष्यमान : संजय वानखेडे यांनी आपल्या धम्म प्रबोधनात्मक मार्गदर्शनात सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या संबोधी प्राप्ती नंतर सर्वात प्रथम कपिलवस्तू नगरी ला भेट . पिता तथा माता यांची भेट . पूर्वाश्रमीच्या पत्नी यशोधरा भेट . भावंडांना अनुक्रमे धम्मदीक्षा देणे . देवदत्त, नंद, राहुल पुत्राला धम्मदीक्षा देणे या मुद्यांवर सखोल प्रबोधन केले .
भा. बौ. म. स. नगर शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान राजूजी फुलझेले यांनी मूर्तीच्या उदाहरणाने प्रबोधनात्मक धम्म समजावला . भा. बौ. म. स. तालुका संघटक आयुष्यमान : सुमेध पाटील यांनी बौद्ध धम्म संस्कार नव्या पिढीला देणे अत्यावश्यक आहे . असे मार्गदर्शन केले . सिद्धार्थ बुद्ध महिला तथा पुरुष संयुक्त पंच समितीच्या अध्यक्षा आयुष्यमती
अनु मानकर यांनी उपस्थितांना उद्बोधक प्रेरणादायी वैज्ञानिक धम्म समजावून दिला.
' ' ज्ञानाचे प्रतिक्र ' ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय समितीच्या अध्यक्षा साधना दहीवडे यांनी मुलांना पालकांनी संस्कारित केले पाहिजे हा विचार मांडला.
यावेळी शोभा डोंगरे , वर्षा झाडे , संगीता दुर्गे , अर्चना झाडे , रेखा तावाडे , विजया झाडे , माया दुर्गे , मनीषा तावडे , गौरा दुर्गे , रीतीका बोरकर , प्रज्वल सागोरे , विराट बोरकर , त्रिषा मुंजेवार , धम्मश्री बोरकर , आऋष ढेकले , लड्डू बोरकर , प्रथमेश सागोरे तथा सिद्धार्थ नगरातील असंख्य नागरिकाची उपस्थिती होती . सूत्रसंचालन विजय झाडे यांनी केला . तथा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश दुर्गे यांनी केला .