माळशिरस प्रतिनिधी
आज बोरगाव भोसले वस्ती येथे महिला आर्थिक विकास महामंडळ,सोलापूर स्थापित उमंग लोकांचलित साधन केंद्र,बोरगाव आणि पारस दूध संघ,तांदुळवाडी यांच्या मार्फत 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्या सभासदाचे जास्त दूध संकलन आहे त्या महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी तालुका व्यवस्थापक मा. रणजित शेंडे साहेब ,पारस चे गोयल सर,माने सर तसेच clf सचिव वैशाली बिले मॅडम clf व्यवस्थापक शिवाजी शेंडगे उपस्थिती होते.
तसेच आज दुपारी नेवरे येते 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचय महिला सदस्या यांचा सत्कार करण्यात आला.
वरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी उमंग clf मधील सर्व स्टाफ यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.