भाळवणी प्रतिनिधी
आपल्या पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनकडून गुरूवार दिनांक 02/03/2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती करण्याकरिता महत्त्वाची मीटिंग भाळवणी ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार आहे.
चोरी दरोड्याची घटना,महिला संदर्भातील गुन्हे,लहान मुल हरवणे,वाहन चोरी,गंभीर अपघात,वन्य प्राण्यांचा हल्ला,आगजळीताची घटना इत्यादी घटनांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे तातडीने मदत मिळवणे व दुर्घटनांना आळा घालणे सहज शक्य होत आहे.या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायतमध्ये होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमासाठीग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, सदस्य,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव,राशन दुकानदार,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,डॉक्टर,शिक्षक तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित रहावे ही विनंती ग्राम विकास अधिकारी वाघमारे यांनी केली आहे.