जुना प्रभाग 18 व 20 नागेंद्र नगर येथे भीमाशंकर टेकाळे आयोजित "हात से हात जोडो अभियान, महिला दिनाचे औचित्य साधुन महिला सन्मान, साड़ी वाटप
सोलापूर प्रतिनिधी
जूना प्रभाग क्रमांक 18 व 20 नागेंद्र नगर, स्वागत नगर रोड येथे "हात से हात जोडो" अभियानाची महत्वाची बैठक, तसेच महिला दिनाचे औचित्य साधुन कर्तुत्ववान महिलांचा सन्मान, साड़ी वाटप, ई श्रम कार्ड वाटप, कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सेवादलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी आयोजित केली होती या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, रेशनवर धान्य मिळत नाही, भाजपच्या चुकीच्या धोरनामुळे, नोटबंदी GST मुळे उद्योगधंदे बंद पड़त आहेत, धार्मिक उन्माद पैदा केला जात आहे, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ, महिला अत्याचार, नवीन कायदे आणून यंत्रमाग, वीडी उदयोगाला, बांधकाम कामगारांना त्रास दिला जात आहे, या सर्वांच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि विरोधक आवाज उचलला तर मीडिया दाखवत नाही, म्हणून राहुलजी गांधी यांनी जनतेत जाउन लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली, लोकांचे अडचणी जाणून घेतल्या. हळूहळू जनतेत जागृती होत आहे म्हणून परवाच झालेल्या पोटनिवडणुकित खोके सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह अख्खे मंत्रमंडळाने, प्रचंड पैसा वापरून प्रचार यंत्रणा राबवून ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात दारुण पराभव झाला. बाकी ठिकाणी सुद्धा त्यांचे सीट कमी झाले मताची टक्केवारी घटली आहे. आपल्या बाजूला जनाधार नाही म्हणुन शिंदे फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. भाजपच्या कारभाराला जनता वैतागली आहे. लोकांना कळून चुकले आहे की भाजपचे लोक फ़सवे आहेत. गोरगरीब, कामगार, महिलांचा, सर्वसमान्यांचा एकच वाली तो म्हणजे काँग्रेस, काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसमान्यांचा विचार करून काम करतो. महिलांना आदर, सन्मान देणारा काँग्रेस पक्ष आहे. आणि आमच्यावर विश्वास आहे म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमास उपस्तित आहात म्हणुन सर्वाचे धन्यवाद, आज सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी घेतलेल्या हात से हात जोडो बैठक, कर्तुत्ववान महिलांचा सन्मान, साड़ी वाटप, ई श्रम कार्ड वाटप कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला त्या बद्दल ही आभार, महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व महिला भगिनींना शुभेच्छा ही दिल्या.
या कार्यक्रमास संयोजक भीमाशंकर टेकाळे, मा. नगरसेवक रियाजभाई हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, मा. नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन ईनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, माजी नगरसेवक NK क्षीरसागर, हारून शेख, चन्नबसप्पा देगिल, अँड केशव इंगळे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, अशोक कलशेट्टी, नागनाथ कदम, तिरुपती परकीपंडला, अप्पासाहेब बगले, VD गायकवाड़, शोहेब महागामी, प्रमिला तुपलवंडे, भाग्यश्री कदम, मीरा घटकांबळे, चक्रपाणी गज्जम, विवेक कन्ना, शकील शेख, नूर अहमद नालवार, शोहेब कडेचुर, दीनानाथ शेळके, पृथ्वीराज नरोटे, सलीम मनुरे, राजेंद्र शिरकुल, रविकांत कल्याणकर, चंद्रकांत टिकके, लता सोनकांबले, वसिष्ठ सोनकांबले, शकूर शेख, दिनेश गायकवाड़, दत्ता लोकरे, मेहमूद शेख, चंद्रकांत गंगावरकर, महादेव रनशूर, अशोक व्हटकर, सोनटक्के साहेब, जितराज गरुड़, अजयसिंह, मूसा शेख, सीताराम खरटमल, विश्वनाथ निरंजन, शशिधर हिटनल्ली, शिवपुत्र भद्रे, अमित फुटाने, नीलेश सोनगीवाले, शितलकुमार टेकाळे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक भीमाशंकर टेकाळे, सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी केले.