जनतेची भेट म्हणजे आनंद, समाधान व निःस्वार्थ प्रेमाचे क्षण !
पंढरपूर प्रतिनिधी
विविध निमित्ताने जनतेची भेट घडत असते, या सगळ्या भेटीत साम्य ठरते ते म्हणजे निःस्वार्थपणाची भावना. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या भेटीगाठीत अफाट प्रेम करणारे नागरिक, माय माऊली तसेच व्यापाऱ्यांची भेट झाली.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले,या भेटीत विविध विषयांवर सर्वंकष चर्चा झाली. ही चर्चा काहीशी औपचारिक तर काही अनौपचारिक ठरली. मात्र यातून कामाचा थकवा दूर होऊन मन प्रसन्न झाले. तसेच या संपूर्ण चर्चेतून पंढरपूर शहराच्या विकासासाठी अनेक नवीन कल्पना समोर आल्या. या कल्पना पंढरपूर शहराला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
या सर्व सहकाऱ्यांचा उत्साह आश्वासक आहे. या उत्साहाने व विश्वासाने प्रत्येक कार्य सिद्धीस जाईल यात कुठेलीही दुमत नाही. जनतेची होणारी भेट कुठल्याही कारणाने झाली तरी त्यातून मिळणारी ऊर्जा व प्रेरणा अद्वितीय आहे. असे अभिजित पाटील यांनी सांगितले.

