सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेतील सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी विद्येची स्फुर्तिनायीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका यांचे हस्ते व प्रशालेचे प्राचार्य अशोक बनसोडे व पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांचे उपस्थितीत करण्यात आले.प्रशालेतील शिक्षिका सविता इंगळे,प्रतिभा जावीर,सरस्वती शिंदे व अंजली कापसे यांचा सत्कार प्रशालेतील मुलींनी केला तर शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी बनवणा-या सीमा खंडाळे,रखमा वाघमोडे या महिलांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन
प्रशालेतील सर्व शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आला.भारतीय स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्या-या महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या सत्कार्याचे,त्यागाचे,सर्व समाजासाठी वाहिलेल्या जीवनाचे स्मरण आणि आईवडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थीनींनी कोणत्याही बाबतीत न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने यशाची शिखरे सर केली पाहिजेत असे इंगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.प्रास्ताविक सुरेश कट्टे यांनी केले.राजेंद्र जाधव यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले.यावेळी विलास दराडे,जैनुद्दीन शेख,महेश देशमुख, देवदत्त वाघ,नितीन वायदंडे,श्रीकांत चंदनशिवे,गणेश पाटील,प्रथमेश गावडे, नवनाथ लोणकर,बबन कोकतरे,धनाजी देठे,विष्णूपंत घोगले, समाधान शेजाळ, राजकुमार ढगे,किरण बोधले,सुभाष देवकर, बबन पवार,बाळू बनसोडे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.