सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विषारी ताडीचे घरगुती दुकाने आहेत. या बेकायदेशीर घरगुती ताडी विक्री दुकानात विषारी ताडी पिऊन असंख्य लोक मरण पावलेले आहेत. यामुळे त्या मरण पावलेल्या कुटुंब उघड्यावर आले आहे. म्हणून सदर बनावट ताडी विक्री करणारे घरगुती दुकानावर कारवाई करून बंद करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मा. अधीक्षक उत्पादन शुल्क खाते सोलापूर यांना देण्यात आली.
मा. उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिलेले निवेदनात सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती बनावट विषारी ताड़ी विक्री करणारे आपल्या घरातच विनारी द्रव आणि अल्कोल नाशिली द्रव पदार्थ वापरून ताडी तयार करतात आणि ग्राहकांना २४ तास विक्री करतात असे ताडी विक्री करणारे समाज कंटक व समाज द्रोही विशेष करून कामगार वस्त्यात, झोपडपट्ट्या, गरीब वस्त्यात, मोठ्या प्रमाणात आहेत घरगुती ताड़ी पिऊन आज पर्यंत हजारो लोक मृत्युमुखी पावलेले आहेत आणि हजारो लोकांच्या डोक्यावर परिणाम होऊन मतीमंद झाले आहेत अशा मृत्यू व मतीमंद झाल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत तरीही आपल्या खात्या मार्फत म्हणावे तसे कडक कारवाई झालेले नाही. इतकेच नव्हे तर है घरगुती बेकायदेशीर बनावट विषारी ताडी सर्रास पणे विकण्यामागे आपल्या खात्याचे व पोलीस खात्याचे हित संबंध आहेत असे दिसून येते एकूणच या घरगुती बेकायदेशीर विषारी ताडी विक्रीचे केंद्रामुळे सोलापूरचे विनाश होण्याचे एक कारण आहे सदर बेकायदेशीर बनावट ताड़ी विक्री केंद्र खालील मुल्यात अधिक प्रमाणात आहेत
*१) जुना विडी घरकुल हैद्राबाद रोड सोलापूर २) लष्कर (सदर बझार विभाग) ३) प्रकाश बापूजी हॉसिंग सोसायटी ४) साईबाबा चौक ५) ७० फूट रोड ६) १ ले ७ गांधी नगर अक्कलकोट रोड ७) घाँगडे वस्ती ८) भवानी पेठ ९) मोदी विभाग १०) २ नं झोपडपट्टी १९) रामवाडी १२) सरस्वती चौक (लष्कर) १३) व्यंकटेश झोपडपट्टी दाजी पेठ १४) नीलम नगर १५) सुनील नगर १६) एम.आय.डी.सी. १७) विनायक नगर १८) गवई-पेठ १९) जोडभावी पेठ २०) कुचननगर* या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी बनावट विषारी ताडी घरगुती विक्री केंद्र आहेत
तरी माननीयानी या सर्व बनावट घरगुती विषारी ताडी विक्री केंद्रावर कारवाई करून सर्व घरगुती विक्री केंद्र बंद करावे हि विनंती असे नमुद करण्यात आला आहे.
सदर निवेदनाचे
*प्रत माहितीस्तव*
*१) मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई २) मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ३) मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ४) मा. गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ५) मा. राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई ६) मा. पालकमंत्री सोलापूर जिल्हा* यांना पाठविण्यात आला आहे
विष्णु कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आ, साक्षी आळगी, प्रियांका कनकी, शोभा पोला, शरणप्पा जगले, बालाजी भंडारी, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरूनाथ कोळी, नागार्जुन कुसुरकर, मुनिर रंगरेज, जुनेद चांदा आदींचा समावेश होता.