सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग विभाग व पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रयोजित ' डिप्लोयिंग अँड रनींग युअर अँप्लिकेशन ऑन सर्व्हर ' या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये डिप्लोयिंग अँड रनींग युअर अँप्लिकेशन ऑन सर्व्हर याविषयी माहिती देण्यात आली.
सदर कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे,डॉ. एल.एम.आर.जे. लोबो,भाविक शहा,कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ.दत्तात्रय गंधमल, उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ.शंकर नवले व डॉ. दत्तात्रय गंधमल यांनी या डिप्लोयिंग अँड रनींग युअर अँप्लिकेशन ऑन सर्व्हर याविषयी माहिती सांगितली.सदर कार्यशाळेत एकूण 104 वेगवेगळ्या कॉलेजमधील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेमध्ये डॉ. एल.एम.आर.जे. लोबो व भाविक शहा या प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. हरीश गुरमे काम पाहिले.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ऋतुजा राऊत व सुझान नदाफ तर आभारप्रदर्शन प्रा. अमोल फाटक यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.सुरज धनवे, प्रा. वैशाली शाखापुरे, प्रा.शैलजा शेळके,प्रा. उर्मिला गटकूल,प्रा. सुचेता नवले, प्रा.अमृता गुंजे,प्रा.अमृता रुईकर,प्रा.सुनील शाखापुरे,प्रा.लक्ष्मीपुत्र मैंदर्गी यांनी परिश्रम घेतले.