"जन औषधी दिन वर्धा येथे साजरा "
वर्धा जिल्हा प्रतिनिधी आकाश सुखदेवे
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत जन औषधी दिनानिमित्य स्थळ पदमश्री स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह, जिल्हा परिषद वर्धा येथे आयोजित कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी श्री रामदासजी तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र यांनी रुग्णांना स्वस्त औषधी मिळावी व जनजागृती करुन या योजनेचा लाभ गरजु गरीब रुग्णांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री रोहनजी घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. वर्धा, डॉ. सचीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा, डॉ. रा. ज. पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.वर्धा, श्री सुरज गोहाड, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वर्धा, श्री सतीश चव्हाण, औषध निरिक्षक, अन्न व औषध प्रशासन वर्धा, व श्री अभ्युदय मेघे, विशेष कार्यकारी अधिकारी, आ.वि.भा.ग्रा.रु. सावंगी उपस्थित होते.
यावेळी रोहनजी घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपले विचार व्यक्त करताना प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचा लाभ रुग्णांनी घ्यावा जेणे करुन अत्यंत स्वस्त दराने रुग्णांना सेवा मिळेल. सतीश चव्हाण, औषध निरिक्षक, यांनी औषधी ही अत्यंत उत्कृष्ट असुन मानकानुसार योग्य व स्वस्त असल्याबददल आपले मत व्यक्त करुन लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेला आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रम प्रसंगी मा. खासदार रामदास तडस यांचे हस्ते रुग्णांना एक महिन्याचे औषध मोफत वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन खालीद खान, संचालक, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र, हिंगणघाट यांनी केले.
या वेळी जिल्हा आरोग्य कर्मचारी, व हमीद खान, अतुल भरने, सकलैन शेख, प्रदीप उमाते, अभिजीत खोड़तकर आदि उपस्थित होते.