करकंब ग्रामीण भागातील या वक्तृत्व स्पर्धेत 87 स्पर्धकांचा सहभाग
करकंब प्रतिनिधी
आज नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने आयोजित शिवजयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला माता चौंडेश्वरी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन केडी न्यूजचे सागर थिटे,श्रीराम प्रतिष्ठान चे विजय भागवत लेकीच झाड अभियान टीमचे नंदलाल कपडेकर,विजय जाधव,प्रमोद रेडे, देविदास काटवटे,आणि आयोजक नादब्रह्म कला फाउंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे यांच्या शुभहस्ते झाले आणि स्पर्धेला सुरुवात झाली,१ली ते ४थी आणि ५वी ते १०या दोन गटात स्पर्धा आयोजित करताना अतिशय सुंदर विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत आयोजकांना यामुळे प्रेरणा आणि उर्जा मिळाली आहे, एकुण 81 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली,भविष्यकाळात या विद्यार्थ्यांना अधिक चांगल मार्गदर्शन मिळण्यासाठी तीनदिवशीय कार्यशाळा मे महिन्यात आयोजित करण्यात येणार असून सर्व पालकांनी या कार्यशाळेसाठी उत्फूर्तपणे आम्हीं आणि आमचे विद्यार्थी सहभागी होण्यासाठी नक्कीच सहभाग घेऊ सांगितले.
यावेळी सागर थिटे सर, सिद्धेश्वर लेंगरे सर,संजय सांगोलकर सर प्रमोद रेडे यांनी मनोगत व्यक्त करुन शिवजयंती खऱ्या अर्थाने आज साजरी झाली,सांगून स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करुन हे लावलेल्या बीजाच रुपांतर वटवृक्षात करावे सांगितले
या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात मानसी कोरके प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक वेदांत टेके, तृतीय क्रमांक वैष्णवदेवी व्यवहारे उत्तेजनार्थ परी माळी मोठा गट आदित्य मोरे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सुरभी दुधाने तृतीय क्रमांक सार्थक लेंगरे उत्तेजनार्थ सुप्रिया माने पटकावला या स्पर्धेचे परीक्षण सागर थिटे सर, नंदलाल कपडेकर, देवकी दुधाणे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक नादब्रह्म कला फाउंडेशन अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे लेकीच झाड टीम जागर टीम प्रमोद रेडे,संतोष कापसे सर,संजय सांगोलकर सर, अविनाश देवकाते,पुजारी सर,आदींनी परिश्रम घेत स्पर्धा यशस्वी केली,पुढील काळात नादब्रह्म कला फाउंडेशन वतीने पाणपोई, वृत्तपत्र वाचनालय काही दिवसांत सुरू होईल असे सांगितले.