सोलापुर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणारे, उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे, प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वरीष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मा.नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक अध्यक्ष बाबा करगुळे, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष उमेश सुरते, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, डॉ आप्पासाहेब बगले, मधुकर आठवले, तिरुपती परकीपडंला, परिवहन विभाग अध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे, रुस्तम कंपली, राजन कामत, रफिक चकोले, सचिन गुंड, शकील शेख, प्रमिला तुपलवंडे, करिमुनिसा बागवान, शोभा बोबे, नुरअहमद नालवार, विवेक कन्ना, राजेश झंपले, लखन गायकवाड, राजाभाऊ महाडिक, आप्पा सलगार, मुमताज ताबोंळी, सुनिता बेरा, स्नेहल शिंदे, आण्णा जमदाडे, नागनाथ शावणे, पंडित बूवा गणेशकर, आदी उपस्थित होते