माण प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व माढा मतदारसंघातील विकासकामांच्या अनुषंगाने माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडीतील बंगल्यावर राजकीय खलबते होताना पाहायला मिळाली.
या चर्चा सत्रात माढा मतदारसंघाचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार शिंदे, राजकुमार पाटील, शशिकांत चव्हाण, के. के पाटील, शिवाजी शिंदे, अरुण गोरे, विशाल बागल, धनंजय चव्हाण, बजरंग गावडे, सोमनाथ भोसले यांनी सहभाग घेतला.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार तरुण व क्रियाशील असून केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे मोठ्या उमेदीने पाहत आपल्याला पुन्हा एकदा माढा मतदार संघाचा गड ताब्यात घ्यायचा असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
भाजपच्या अजंड्याप्रमाणे राज्यातून ४५ पेक्षा जास्त अधिक जागा जिंकायचे होता. आहेत. त्या अनुषंगाने पहिली बैठक बोराटवाडीत घेण्यात आल्याने माण तालुका हे माढा लोकसभा निवडणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून बोराटवाडीकडे पाहिले जाऊ लागले आहे. एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या माणमधून मिशन माढा स्टार्ट झाल्याचे बोलले जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ही सर्वाधिक लीड याच तालुक्याने दिले होते. मागील निवडणुकीत आमदार गोरेंचा जलवा संपूर्ण माढा मतदारसंघाने पाहायला आहे.
बैठकावर बैठका घेऊन आमदार गोरेंनी सहकाऱ्यांसोबत माढा मतदारसंघात भिरकिट उडवून दिले होते. परिणामी बैठकीच्या अनुषंगाने आमदार गोरे यांच्या बागेतील गुप्तगु यंदा अनेकांना विचार करायला भाग पाडणार हे मात्र नक्की.