मारापूर प्रतिनिधी
मारापूरचे लोकप्रिय सरपंच विनायक यादव यांच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन संजीवनी हॉस्पिटल अँड आयसीयू चे प्रमुख डॉ. विवेक निकम यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
सदर शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब,हृदयरोग,सर्पदंश,विंचू दंश,दमा,टीबी,फुफ्फुसाचे,आजार,मेंदू विकार,थायरॉईड,ग्रंथीचे,विकार,पोट व किडनीचे विकार,कावीळ,संधिवात/ आमवात,विषबाधा,एचआयव्ही निदान व उपचार,शस्त्रक्रिया पूर्व वैद्यकीय तपासणी आधी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी संजीवनी हॉस्पिटलचे डॉ.विवेक निकम, डॉ. अतुल निकम, डॉ.रोहिणी निकम, माने हॉस्पिटलचे डॉ.सदानंद माने, डॉ. वसुधा माने, डॉ.सुशांत माने, डॉ. धवल आवताडे, डॉ.तृषाल यादव, डॉ.दौला ठेंगील, डॉ.नितीन आसबे, डॉ.मंजिरी आसबे डॉ. रवींद्र गायकवाड व डॉ.विजय लवटे हे तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र मंगळवेढ्याचे डॉक्टर उपलब्ध असणार आहेत
या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 26/2/2023 रोजी सकाळी अकरा वाजता शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य प्रांगणात केले आहे. या शिबिरानंतर महाराष्ट्र शासन नियम अंतर्गत व महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत मोफत ऑपरेशनची सोय करण्यात आली आहे. तरी मारापुर परिसरातील नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.