पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचंड विजयी झाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
सोलापूर प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, अमर पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, शिवसेना शहर अध्यक्ष विष्णु कारमपुरी, यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ (पार्क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लाडू वाटप, फुले ऊधळून, फटाके लावून जल्लोष करण्यात आला
यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो, ईडी सरकार नही चलेगी, भाजपा सरकार नही चलेगी, खोके सरकार नही चलेगी, भाजपा सरकार चले जाव, हमसे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा असे घोषणा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरजोरात दिल्यामुळे परिसर दणाणुन गेला.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच पैकी चार ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. अगदी देवेंद्र फडणवीस, गडकरी, बावनकुळे, संघाचा गड़ असलेल्या नागपुर सह चार ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, जूनी पेंशन योजना या सारख्या महत्वाचे मुद्दे होते. शिक्षक आणि पदवीधर बुद्धिवंतानी भाजपा आणि खोके सरकारच्या युतीला नाकारून महाविकास आघाड़ीवर विश्वास दाखविला. काँग्रेस हद्दपार करू म्हणणाऱ्या भाजपचा उद्दपार होण्याची वेळ जनताच आणणाऱ आहे. आगामी काळात आमचे नेते राहुलजी गांधी, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांनी एकत्रितपणे व्यवस्थितपणे नियोजन केल्यास महापालिका निवडणुकीसह सर्व निवडणुकीत भाजपा भुइसपाट होईल. सोलापुर महापालिकेवर निश्चितच महाविकास आघाडीचा झेंडा फड़केल. या निवडणुकीत अनेक संघटनांनी पाठिम्बा दिला त्यांचे व सर्व मतदार आणि सहकार्य केलेल्यांचे आभार व्यक्त करतो.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे नेते संतोष पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या जल्लोष कार्यक्रमात संजय हेमगड्डी, शंकर पाटील, शफी इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सुशीला आबूटे, आरिफ शेख, तौफीक हत्तूरे, प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर बागवान, दत्तात्रय वानकर, अंबादास करगुळे, किसन मेकाले, श्रीनिवास कोंडी, सुनीता रोटे, निशांत साळवे, प्रमोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, रिहान हुंडेकरी, वाहिद बिजापुरे, रवी कांबळे, संतोष केंगनाळकर, भीमाशंकर टेकाळे, अमित भोसले, अंबादास गुत्तिकोंडा, केशव इंगळे, NK क्षीरसागर, हाजीमलंग नदाफ, सिद्राम अट्ठेलुर, संजय गवळी, रॉकी बंगाळे, नागनाथ कदम, अनिल मस्के, हनमंतु सायबोलू, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, युवराज जाधव, मयूर खरात, मधुकर आठवले, हसीब नदाफ, अप्पासाहेब बगले, इलियास शेख, हारून शेख, शोहेब महागामी, VD गायकवाड़, आनंद मुस्तारे, अप्पा सलगर, विश्वराज चाकोते, शोहेब कडेचुर, राजेंद्र शिरकुल, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, विनोद गायकवाड़, कुणाल गायकवाड, पृथ्वीराज नरोटे, रुपेश गायकवाड, सुमन जाधव, संध्या काळे, शिवशंकर अंजनालकर, सुनील सारंगी, शाहु सलगर, गणेश सालुंखे, जीशान सय्यद, लतीफ शेख, समीर काझी, सुभाष वाघमारे, रियाज नाईकवाड़ी, धीरज खंदारे, राजकुमार राठोड, वसिष्ठ सोनकांबळे, विट्ठल कुराड़कर, गुरुनाथ कोळी,दीपक गवळी, नागनाथ शावने, सोमनाथ व्हटकर, चंद्रकांत टिक्के, मनोहर चकोले, अंजलि मंगोडेकर, शशिकांत शेळके, जीवक इंगळे, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, अमीर शेख, सरफराज शेख, इरफान शेख, अनिल बनसोडे, दादा रोटे, अल्मराज आबादीराजे, जावेद शिकलगार, मुन्ना नदाफ, लक्ष्मण भोसले, लताताई ढेरे, नीलाताई खांडेकर, सायरा शेख, प्रतीक्षा चव्हाण, सुप्रिया लोमटे, सिया मुलानी, सुनिता गायकवाड, चित्रा कदम, राजश्री कोडमुर, मनीषा गायकवाड, सावित्री काटकर, छाया वाघमारे, सुरेखाताई घाडगे, नसीमा शेखसंधी, सुनिता गायकवाड, आशालता दीक्षित, कांतनाताई बनसोडे, गौरा कोरे मुमताज शेख, अनिता भालेराव, सविता सोनवणे, चिन्नापा भंडारे, नीता बनसोडे, पंडित बुवा गणेशकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.