पंढरपूर प्रतिनिधी
एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष , डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा 82 वा वाढदिवस पंढरपूर एमआयटी कॅम्पस वाखरी येथे उत्साहात संपन्न झाला.
एमआयटी विश्वशांती गुरुकुल पंढरपूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये रक्तदान शिबिर, महामृत्युंजय यज्ञ, योगा, ब्राह्मण भोजन ,महाद्वार घाट पंढरपूर येथे महाआरती ,भजन, अनाथ आश्रम ,वृद्धाश्रम येथे अन्नदान, धान्य दान विविध सामाजिक संस्थाचालक यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपु डे सर, कार्तिश्वरी मॅडम, शिवाजी गवळी सर व पंढरपूर एमआयटीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले