मुंबई प्रतिनिधी - जनार्दन जंगले
शिक्षक लोकशाही आघाडी (TDF)ने शिक्षण खात्याकडे अनेक प्रलंबित व भ्रष्टाचार प्रकरणी अनेक वर्षे पाठपुरावा केला,कंटाळून मुंबई हायकोर्टात जनहितयाचिका दाखल केली, कोर्टाने पुन्हा शिक्षण खात्याकडे पाठपुरावा करा असा आदेश २०१७ ला दिला, तरीही दाद न दिल्याने ऑक्टो २०१७ मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन पुकारल्याने शिक्षण आयुक्त यांनी परीक्षा परीषद प्रमुख श्री दत्तात्रय जगताप यांचे अध्यक्षते खाली चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती २४.१०.२०१७ मध्ये नेमली.
श्री जगताप यांचे आदेशाना केराची टोपली दाखवली, त्यांनी वारंवार मागणी करूनही चौकशीसाठी कागदपत्रे दिली नाही, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुंबईतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत त्यांनी चौकशी केलीच नाही, पुनश्च आंदोलन केल्यावर शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी यांनी लातूर एसएससी बोर्ड अध्यक्ष श्री महेश करजगावकर यांची दुसरी चौकशी समिती १०.०७.२०१९ रोजी नेमून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, पण त्यांनी आदेश मुंबईतील अधिकाऱ्यांनी चौकशी कामी कागदपत्रे सादर केले नाही.
पण टी डी एफ ची टीम ने लातूरला जाऊन पुरावे सादर केले. करजगावकर यांनी वेळेत चौकशी अहवाल सादर केलात्यानंतर कारवाई होत नसल्याने टीडीएफ ने आंदोलन केल्यावर मा आयुक्त सोळंकी यांनी शिक्षण संचालक यांना १९.०८.२०१९ रोजी आदेश देऊन चौकशी अहवालावर स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दोषींवर कारवाई करण्याची शिफारस करण्याचे आदेश दिले, पण शिक्षण संचालक श्री दिनकर पाटील यांनी अभिप्राय दिलाच नाही, लॉक डाऊन मध्ये टी डी एफ ने आंदोलने केली पण भ्रष्ट शिक्षण संचालकांनी आदेश पाळले नाही, शेवटी आंदोलन केल्यावर मा आयुक्त श्री विशाल सोळंकी यांनी ०८.०२.२०२१ रोजी स्वयंस्पष्ट आदेश शिक्षण संचालक, उपसंचालक मुंबई, तिन्ही शिक्षण निरीक्षक मुंबई यांना सुनावणी घेऊन अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेतराना न्याय देऊन दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले, पण एकाही अधिकाऱ्याने मा शिक्षण आयुक्त यांच्या आदेशांचे पालन केले नाही.
त्यामुळे टीडीएफ ने मा उच्च न्यायालय व मा लोकायुक्त यांचेकडे तक्रारी केल्या, पण शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे यांनी अतिशय चुकीचा रिपोर्ट सादर केला असून अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेतराना न्याय न देता सर्वच दोषी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले ही अतिशय भयावह बाब आहे.दरम्यान आ.कपिल पाटील शिक्षक भारतीचे मुंबई अध्यक्ष डी एस हायस्कूल सायन चे मुख्याध्यापक कै अंकुश महाडीक व शिक्षक भारतीचे कार्यकर्ते कै अरविंद जाधव यांचे शाळेत ऑनड्युटी मृत्यप्रकरण, वैद्यकिय प्रतिपूर्ती मध्ये लाखो रूपयांचा घोटाळा व इतर अनेक प्रकरणे उघडकीस आली, टीडीएफ ने २८ डिसेंबर २२ रोजी उग्र आंदोलनाची नोटीस दिली पण शिक्षण आयुक्तालयाने अन्याय दूर करतो व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आंदोलन मागें घेतले.
तथापि एक महिन्यात काहीही न करीत आयुक्त श्री सूरज मांढरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे दिनांक १३.०२.२०२३ रोजी नाईलाजाने पुनश्च उपोषण करण्याचा निर्णय शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) घेतला आहे. सदर आंदोलनात टी डी एफ चे सल्लागार, माजी उपमहापौर सन्मा बाबूभाई भवानजी आणि जयहिंद सैनिक संस्थेचे अध्यक्ष सन्मा पंजाबराव मुधाने उपस्थित राहणार आहेत, शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष सन्मा अरूण जाधव, समन्वयक सन्मा प्रकाश घोळवे व सर्व घटक संघटना अध्यक्षांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहिर केला आहे