पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका व असंख्य एड्सग्रस्त बालकांचे जीवन उजळून टाकणाऱ्या मंगलताई शहा यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित “आणि ते मंगल झाले” या जोहडकार सुरेखा शहा लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ता.२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मा.आमदार प्रशांत परिचारक ,भागवताचार्य ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले आणि या पुस्तकाच्या लेखिका सुरेखा शहा आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे.पंढरपूर अर्बन बँकेच्या खवा बाजार येथील कर्मयोगी सभागृहामध्ये गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी संस्थेच्या वतीने डिंपल घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.