पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी "राष्ट्रीय विज्ञान दिन" संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष वसंत (नाना) देशमुख, जि.प.सदस्य.कासेगाव यांच्या हस्ते जागतिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन,आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.तर प्रमुख उपस्थिती म्हणून लक्ष्मीप्रसाद मोहिते अध्यक्ष विज्ञान परिषद सोलापूर जिल्हा सोलापूर.तसेच अमोल बरंल लीड कॉर्डिनेटर हे उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की वर्षातून एक तर किमान विज्ञान प्रदर्शन घेतले पाहिजे.भारतात १९८६ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी रामन परिणामाचा शोध लावला. यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्कार ने गौरविण्यात आले. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.भारतीय शास्त्रज्ञ, शैक्षणिक,वैद्यकीय,तांत्रिक संशोधन,आणि सर्व महाविद्यालय,विद्यापीठ,शैक्षणिक संस्था,शास्त्रज्ञ संशोधक.हा दिवस खूप उत्साहाने साजर करतात.
भारतीया मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला जावा,समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी.राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे, यासह देशात आणू ऊर्जा विषयी असलेले व्यक्तीच्या मनातील भीती दूर करणे. हे या विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रोजेक्ट सादर केले यामध्ये विज्ञान विषयाचे ३६ प्रोजेक्ट तसेच गणित विषयाचे ३६ तर इतर २३ प्रोजेक्ट असे एकूण ९५ प्रोजेक्ट या दिनानिमित्त सादर करण्यात आले.अशी माहिती लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.
या विज्ञान दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे.संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे,पालक प्रतिनिधी अस्मिता वाडदेकर यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक राजकुमार बंडगर तर आभार प्रदर्शन शिक्षिका अंजली मोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी परिश्रम घेतले.तसेच हे सर्व प्रोजेक्ट पाहून पालक,शिक्षक,विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.