सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक, इंग्लिश मिडियम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमा पूजन प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, ज्येष्ठ शिक्षक धर्मराज बळारी, राजेंद्र मुलगे सिद्धाराम कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले .
या विज्ञान प्रदर्शनात महेश बिराजदार, गणेश गडगी, साई एकलदेवी, नेहा मेरगू ,मुरारी मेरगु, राज दूबास, श्रीशैल निम्बर्गी ,विघ्नेश मीट्ठा, राकेश गुत्तीकोंडा ,अथर्व सरवदे, पियुष कांबळे, रोहित देशमुख, लावण्या चिद्रे, अंबिका अलगुंडगी, हेमा झुंजा ,प्रचिता श्रावण, गायत्री भैरगुंडे ,विघ्नेश गड्डम, प्रतिभा पाटील , रूतिका कंदीकटला, ईश्वरी नलावडे ,भावना बिल्ला, रंजना जिंदम कोमल चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गवत काढण्याचे यंत्र, एटीएम कार्ड मशीन, सीड जर्मिनेशन , व्हायब्रेटिंग वाशिंग मशीन ,जनरेटर ,पझल गेम, चिल्ड्रन सेफ्टी आलार्म, कॅप फॅन, फंक्शन ऑफ किडनीज ,रेन वॉटर हार्वेस्टिंग ,जलचक्र, एन्व्हायरमेंटल मनी बँक,थ्री डी हॉलोग्रम बॉक्स असे विविध विज्ञान साहित्य प्रदर्शनात मांडले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर यांनी विज्ञान साहित्यांचे पाहणी करुन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर आभार शिवकुमार शिरुर यांनी मानले.
हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.गीता चव्हाण, पीरप्पा अंबारे, प्रज्ञा धुमशेट्टी, विद्या चिक्कल्ली,प्राथमिक शाळेचे शिक्षक भारती पाटील,सुनिता पवार ,कल्पना अकळवाडी , जगदेवी निंबर्गी, प्रशांत बत्तुल , राजशेखर पाटील, जगदेव गवसने, इंग्लिश मिडीयम शाळेचे शिक्षक केदार कुंभार, गंगुल, कदम,मोरे,कोळी आदींनी परिश्रम घेतले.